Uncategorized

नागपुर अमरावती महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था जागोजागी खड्डे च खड्डे

पंकज वानखेडे ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::

👇 # महामार्गाची व्यवस्था सांभाळनारी अटलांटा ठरतेय आहे निष्क्रिय कंपनी

नागपूर ते अमरावती मुख्य महामार्गावर नागपुर ग्रामीण भागात डिफेन्स गेट समोर आठवा मैल चौक आहे ईथे असलेल्या सर्व्हिस रोड ची स्थीती प्रत्येक वर्षी अतीशय दयनीय असते. याच सर्विस रोडनी इतर गाव खेड्याचा संपर्क सुद्धा होतो ,
साप्ताहिक बाजार,मार्केट, पाटनसावंगी सावनेर छिंदवाड़ा महामार्ग सुद्धा जातो ,जागोजागी खड्डे च खड्डे पडले असता त्यामूळे दुचाकी, चार चाकी वाहनांचे अमाप प्रमानात नुकसान तर होतेच तसेच अनेक दुर्घटना सुद्धा होत आहे. हा महामार्ग अनेकांचे जिव घेनारा मार्ग म्हनुन सर्वत्र कड़े प्रसिद्ध आहे वाडी ते वडधामणा पर्यंत जिव हातात घेउन चालावे लागतात घरातली व्यक्ति घरि येई स्तोवर घरच्यांच्या जीवात जिव नसते रोज एक नवीन दुर्घटना कानावर ,वर्तमान पत्रात व अनेक प्रसार माध्य्मात येत असते कुनाच्या घरचा दिवा या महामार्गावर कधी मालवेल हे ही सांगता येत नाही अनेक निष्पाप लोकांचे काही कारण नसतांना सुद्धा दूरदैवी पद्धतिने जिव अटलांटा कंपनीच्या निष्क्रियते मुळेच गमावला लागला आहे आणी रोज जातो सुद्धा आहे,भरधाव चालना-या मोठ मोठया ट्रेवल्स,ट्रक,बस,जीप कार ची नेहमी च भिती असल्यामुळे नागरिकांना सर्विस रोड चाच उपयोग करावा लागतो पण काही ठिकाना वर तर सर्विस रोड सुद्धा नाही जसे गणेश नगर भारत नगर ते टिसी आय पेट्रोलपंप पर्यंत सर्विस रोडच नाही नागरीकांना आठवा वा मैल पासुन वडधाम्ना सुरा बर्डी पर्यंत जाऊन वेढ़ा देत रोजच जाने येने रात्रि बे रात्रि परत यावे लागते जिथे सर्विस रोड आहे तिथे अनाधिकृत भररस्त्यावर नको तिथे आटोवाल्यांची ,ट्रकांची पार्किंग ,नको असलेल्या अनाधिकृत दुकानांची अतिक्रमने यासाठी अनेकदा अटलांटा कंपनी कड़े कित्येकदा निवेदने आवेदने दिली पण अटलांटा कंपनी ही बघ्याची भुमिका घेत आहे असे आक्रोश व्यक्त करित भारत नगर,गणेश नगर ,दवलामेठी दृग्धामना च्या स्थानिय नागरिकांनी असे सांगीतले फक्त त्यांचे लक्ष टोल टेक्स वसुलितच व नवीन कॉटरेक्ट कड़ेच असते इकडे काहिच लक्ष नाही त्यांना कुनाचे काय होते कोण जगतो ,तूटतो की मरतो ,रोज कसा काय त्रास सहन करावा या सोबत काही घेणे देने नाही पथ दिवे व बिल्न्कींग , सूचना फलक ,चिन्हे सुद्धा नाही विध्यार्थी मुलांना शाळेत ये जा करतांना खुप त्रास सहन करावा लागतो.रस्त्याच्या दुर्गतिमुळे कधी कधी चिमुक्ल्यांचा,महिलांचा, वयोवृद्ध , नागरिकांचा अपघात ,तोल सुद्धा जातो व त्या घानेरडया पाण्यात चिखलात पडतात , सर्व्हिस रोड लागतं असलेल्या व्यापाऱ्यांना यामुळे व्यवसायात अती नुकसान होतो.
मागच्या वर्षी जागृत नागरिकांनी व काही राजनितिक संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिली होती तेव्हा तात्पुरता कामचलाऊ काम अटलांटा कंपनी कडूंन करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम केल्या मुळे या वर्षी पून्हा तिच परिस्थिती जैसे थे वैसे .
स्थानिय नागरिकांनी आक्रोश व्यक्त करित संबधित विभागाने जातिने लक्ष देऊन त्वरित सर्व्हिस रोड ची उच्च दर्जाची दुरुस्ती करावी अन्यथा स्थानिक पालक नागरिकांन मद्धे आक्रोश ,पालक दुकानदार , व्यापारी , राजकीय तसेच सामाजिक संघटना यांणी अटलांटा व शासण,प्रशासणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करन्याची चेतावनी दिली आहे आम्ही सर्व तीव्र आन्दोलन करन्याच्या तयारित असल्याची माहिती स्थानिय नागरीकांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button