Uncategorized

प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यावर हल्ला

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
“पोलीस की आवाज” न्यूज नेटवर्क. :::::

👇 आकोट येथील घटना

👇 पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्ह्याची नोंद

प्रेमविवाह करणाऱ्या
दाम्पत्यासह मुलाच्या वडिलांवर हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आकोट येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी अड्याळ पोलिस ठाण्यात मुलीच्या माहेरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पती फिरोज धनराज तेलमासरे (२५), पत्नी पूजा फिरोज तेलमासरे (२०), वडील धनराज तेलमासरे रा. आकोट अशी जखमींची नावे असून त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आकोट येथील पूजा तुळसकर हिने आकोट येथील हॉटेल चालक फिरोज धनराज तेलमासरे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच गावातील असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. या विरोधामुळे त्यांनी मोहाडी येथील मंदिरात जाऊन लग्न केले. त्यानंतर कोंढा येथील मंगल कार्यालयात स्वागत समारंभ कार्यक्रमही पार पडले.

२५ जुलैच्या रात्री ८ च्या सुमारास पूजा हिच्या हाताला बांगडी रुतल्यामुळे फिरोजने तिला कोंढा येथील रुग्णालयात नेले. यादरम्यान त्याला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ‘तू माझी रिपोर्ट का दिलास, तू आकोटला ये. तुला पाहून घेतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर फिरोजने पत्नीला आकोट येथे घरी सोडून हॉटेलात आला. तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीसह भोजराज तुळसकर (४०), अंकित तुळसकर (२४), हितेश तुळसकर (३०), योगेश तुळसकर (२७), प्रदीप तुळसकर (४०) यांनी शिवीगाळ करून फिरोजला काठीने मारहाण केली. त्यावेळी हॉटेलमध्ये असलेले फिरोजचे वडील धनराज तेलमासरे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भांडण सोडवण्यासाठी आलेले काका, काकू व पत्नी पूजा यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. यात फिरोज, पूजा व वडील धनराज यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अड्याळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलिस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक हेमराज सोरते तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button