Uncategorized

लालपरीची कथा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चँनल

राजेश ऊके
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चँनल
एस.टी.ने रस्ते नसताना
पैसेंजर नसताना
एक दोन पैसेंजरसाठी
नियमित मैलोनमैल धाव घेतली…
लाल धुरळा उडवत
गावोगाव धावत एस.टी. वेळेत पोहोचली…
पण आता लोक सुधारले
पैसे आले मग
झाकपाक ट्रैव्हल्स गाड्या दिसु लागल्या…
एसी.टि.व्ही.स्लीपर
सर्व सुविधांनी सज्ज….
मग बिचा-या गरीब एस.टी.ला कोण विचारतंय?
सगळे रंगल्या थोबाडाचे मुके घेऊ लागले…
तरीही एस.टी.ने सेवाभाव सोडला नाही… तोट्यात बिना पैसेंजर तशीच खुळ्यासारखी धावु लागली एस.टी….
मला तीच्या भल्या मोठ्या काच डोळ्यांत पाणी दिसलं…
एस.टी.कधी बोलली नाही
पण तीच्या कर्कश घरघर निर्दयी वाटणा-या आवाजामागे तीचं हळवं मन मला दिसलं…
गरीब असताना तीच्यातून लांब पल्ले गाठलेले लोक तिला विसरले…
तीची ही आगतिकता होती….
तीला झगमगाट करता नाही आला….पण ती सेवाभावी राहिली…
आजही कुणी पैसेंजर नसेल तरीही ती आपलं कर्तव्य करतेय….
तीच्या हरवलेल्या भवितव्याचा मार्ग विसरुन ती आजही तशीच धावतेय….
एकदिवस तुमची गाडी घरी ठेवून
तीला कधीतरी हात दखवा…
एक मौज म्हणून तीच्यातून प्रवास करा…
तीला बरं वाटेल…
तीने तुमच्या आमच्या पडत्या काळात ,पन्नास साठ किलोमीटर अंतर सव्वातीन रूपयांत फिरवलं आहे…
तीच्यामुळे अनेक माणसांची ओळख झाली आहे…
तीने बरंचसं दिलं आहे
अगदी तुमची ‘गर्लफ्रेंड’ सुद्धा तीचीच देण असु शकते…
सुरक्षित प्रवासाची हमी तीने दिली आहे…
गजबजीत खिडकीजवळ
शांत झोप तीनेच दिली आहे…
बरंच काही
एका पासवर महिना फिरवत पगारातला खर्च वाचवला आहे….
तीला विसरु नका…
जमल़च तर रोज नाहीतर
आठवड्यातून एक दोनदा
तीची आठवण म्हणून
तीच्या गरीब बिचा-या
छताखालून आईच्या कुशीत विसावल्या भावनेने प्रवास करा …
तीला धन्य वाटेल……🙏
मला अभिमान आहे की मी लालपरीचा सेवक आहे….🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button