Uncategorized

सुप्रसिद्ध लेखक राजेश बाळकृष्ण डोमळे एशिया अवॉर्ड 2022 ने सन्मानित

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

संजीव भांबोरे   

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)प्रयत्नांती परमेश्वर” ,”प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे” असे म्हणतात ते खोटे नाही ! आयुष्यात प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्या ईच्छाशक्तीला जर परिश्रम,चिकाटी,जिद्द आणि अभ्यास यांची जोड असेल तर आभाळाएवढी कीर्ती आणि यश मनुष्यासाठी कठीण नाही,हे सिद्ध करून दाखवले आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास या छोट्याशा गावातील राजेश बाळकृष्ण डोमळे यांनी! राजेश डोमळे यांना नुकतेच “एशियाज बेस्ट ऑथर अवॉर्ड 2022” ने सन्मानित करण्यात आले. राजेश बाळकृष्ण डोमळे हे देशातील सुप्रसिद्ध लेखक असून त्यांनी लिहिलेल्या “इंडिया निड्स कलाम नॉट कसाब” या इंग्रजी कादंबरीसाठी त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील “हॉटेल ब्रिज रेसिडेंसी” येथे 19 जूनला संपन्न झालेल्या भव्य आणि शानदार पुरस्कार सोहळ्यात राजेश डोमळे यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. “मालदीव” या देशाच्या केंद्रीय महिला व समाजकल्याण मंत्री श्रीमती झिफ्लिना हसन आणि एशिया अवॉर्डचे संचालक एस.अबुताहीर यांच्या हस्ते राजेशला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मलेशिया,मालदीव,श्रीलंका, नेपाळ,मॉरिसश,फिलिपाईन्स, केनिया,चीन,जपान,सिंगापूर अशा आशिया खंडातील प्रमुख वीस देशांतील प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे! भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास हे राजेश डोमळे यांचे मूळ गाव. सध्या राजेश डोमळे हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे विश्व हिंदू परिषद तर्फे संचालित “गुरुकुल आश्रमशाळेत” सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .राजेशने संपादन केलेले हे यश अभूतपूर्व असून त्यासाठी फक्त आसगावच नव्हे तर संपूर्ण भंडारावासीयांना राजेशवर गर्व आहे ! राजेशच्या या यशात त्याचे भाऊजी रमेश भजे, ताई पुष्पा भजे, मोठे बंधू आणि मार्गदर्शक डॉक्टर अनिलभाऊ धकाते,खासदार सुनीलभाऊ मेंढे, अनिलभाऊ मेंढे, प्रिय आणि जिवलग मित्र विजय पाटील, अमित रेवतकर ,डॉक्टर अनिल मिसार, मनोजभाऊ शेंडे, प्रा.प्रेमानंद हटवार,विशाल बोरकर, मंगेश बोरकर, शेखर पडोळे, प्रशांत घाटबांधे,मुख्याध्यापक अनमोल राऊत , अनिल कंगाली ,महेश जटाल,मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांचा सिंहाचा वाटा आहे ! राजेशने संपादन केलेल्या या अलौकिक आणि अभुतपुर्व यशाबद्दल सर्वांना राजेशचा अभिमान आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button