Uncategorized

तुमसर येथे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी कारगील स्मारकावर श्रध्दासुमन केले अर्पित

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

संजीव भांबोरे//राजेश ऊके(चीफ एडीटर,पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) 26 जुलै 1999 रोजी भारत देशातील विर जवानांनी पाकिस्तान सोबत झालेल्या कारगील युध्दात आपल्या प्राणांची आहुती देत कारगील ची लढाई जिंकुन भारताचा तिरंगा फडकवला.त्या दिवसांची आठवन म्हणुन आज 26 जुलै रोजी संपुर्ण देशात कारगील विजयी दिवस साजरा करण्यात येतो.त्या कारगील युध्दात सहभागी असलेले तुमसर येथील माकडे नगरातील रहिवासी व सैन्यातील जवान राजीक शेख यांच्या कल्पनेतुन तुमसर शहरात कारगील युध्दात शहिद जवानांच्या स्मृतीत माकडे नगरात कारगील युध्दात शामील असलेली तोप व सैनिक यांची प्रतिकृती असलेले स्मारक ,राजीव शेख यांनी निर्माण करत “”कारगील स्मारक “”तयार केले असुन त्या स्मारकावर रोज जवानांच्या स्मृतीत दिपक लावण्याचे ही कार्य राजीक शेख , जवान हा करत असतो.आज कारगील विजयी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या हस्ते कारगील स्मारकावर दीप प्रज्वलीत करुन पुष्पचक्र वाहुन विर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी राजीक शेख,मुकेश सहारे ,अनिल कारेमोरे ,सुनिल थोटे,पवन किरपाने, सह नगरातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button