Uncategorized

समरगीत स्पर्धा नागपूर येथे आयोजित साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & संच करणार

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय १, चंदननगर,नागपूर येथे आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धा दिनांक 27 जुलै 2022 ला आयोजित करण्यात आली आहे.
त्यामध्ये कामगार कल्याण केंद्र साकोली चे केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली चे पदाधिकारी कलावंत समरगीत सादर करणार आहेत.
त्यामध्ये संचात जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, क्रिष्णा हातझाडे, सोनू मेश्राम, संदीप कोटांगले, पितांबर सूर्यवंशी, गुड्डू बोरकर, अभिषेक रामटेके, सोनू लाडे, प्रियंका गायधने, अर्चना कान्हेकर, दीपाली भराडे, खुशाल विठोले ,तनुजा नागदेवे हे सहभागी असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button