Uncategorized

तुमसर एसटी आगार मध्ये असुविधांचा अंभार

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता* -तुमसर आगार चालणाऱ्या तुमसर -लोभी वेळ 3.30 वाजता सुटणाऱ्या बस मध्ये पाणी गळत असल्याची माहिती *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* ला मिळाली. प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

सविस्तर व्रुत्त असे की दिनांक 23जुलै 2022 ला दुपारनंतर 3.30 वाजे सुटणाऱ्या बस मध्ये पाणी येत असल्याने सीट वर पाणी गळत असल्याने प्रवासात अडचण निर्माण झाली.

त्याचप्रमाणे सांयकाळी 4.30वाजे नंतर सरळ हाँल्टिंग बस 7.00 वाजेला आहे व नागपुर वरुन ऊशीरा बस आल्याने प्रवाशांना 8.00 ते 8.30वाजेपर्यंत वाट बघावी लागते.

जर सांयकाळी 6.00 वाजे दरम्यान बस बावनथडी पर्यंत जाणारी असली तर प्रवाशांना सोयीस्कर जाणार आहे असे *पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क ला लक्ष्यात आले व तुमसर वरुन येणाऱ्या व्यापारी वर्गाना तुमसर कडे परततांना सोईचे होईल.

ही बाब *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*ने तुमसर आगार प्रमुख व वाहतूक नियंत्रण अधिकारी भंडारा यांना दुरध्वनी द्वारे कळविले.

सर्व प्रवाशांचे लक्ष ह्या बाबिकडे वेधले आहे की बातमी लागताच एस. टी. महामंडळ काय प्रतिक्रिया करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button