Uncategorized

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनीधी
जाम नदीकाठच्या गावांना (सतर्कतेचा) सावधानतेचा ईशारा
अतीवृष्टी मुळे शेतकर्यांचे उभे पीक नष्ट
पीकांचे नुकसानी चे पंचनामे करण्याचे निर्देश
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनीधी

कोंढाळी-वार्ताहर
मागील 15दिवसा पासुन संततधार पावसाने 21व22जुलै ला काही उसंत दिली । मात्र 23जुलैला दुपारी दोन वाजता नंतर पुन्हाः जोराच्या पावसाच्या तडाख्याने कोंढाळी भागातून वाहनारी जाम नदी दुथड्याओसांडून जबर पूर आला। या मुळे कोंढाळी व दुधाळा गावांचे मधोमध वाहनार्या जाम नदीचे पात्रलगत चे काही घरात पुराचे पानी घुसले होते। तर कोंढाळी- दोडकी-घुबडी मार्गावरील जामनदीचे पुलावर पूराचे पाण्याखाली मुळे ग्रामीण भागातील स्कूल बस सेवा पुरा मुळे अनेक तास थांबून राहील्या। कोंढाळी भागात संतत धार पावसामुळे जाम नदी लगतचे धुरखेडा, मासोद, जाटलापूर, दोडकी, पांजरा काटे, दुधाळा , कोंढाळी, तसेच धोतीवाडा या गावांना सतर्कतेचा ईशारा ईशारा देण्यात आला असून काटोल चे तहसीलदार अजय चरडे यांचे सुचनेवरून कोंढाळी चे राजस्व मंडळ अधिकारी एस के साददकर, ग्राम अधिकारी अनील दुनेदार, कुणाल पिंजदुरकर, राजेंद्र सरोदे, पोलीस पाटील जानेश्वर रेवतकर तसेच संबधित गावांचे ग्राम अधिकारी यांनी नदी व मोठे ओढ्या लगतचे गांवाना पोहचून गावकरी व जन प्रतिनिधिंना पुरापासून सावधगीरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे । त्याच प्रमाणे कोंढाळी व दुधाळा येथील जाम नदी पात्र लगत असलेल्या अतिक्रमण करून घरबांधनार्या ना पोलीसांचे सहकार्यांने त्यांना येथील विश्राम भवनात तातपुरता आश्रय देण्यात आला आहे।
अतिवृष्टी मुळे पीकांची हाणी
सर्वेक्षण करण्याचे निर्देश
मागील 15दिवसा पासुन संतत धार पावसामुळे नदी नाले काठच्या शेती सह कोंढाळी भागातील शेतकर्यांच्या शेतातील पावसाचे पानी जमा असल्याने खरिप हंगामातील बहूतेक सर्व पीक तसेच बागायती पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे तर जनप्रतिनिधि गावो गावी फिरून पावसाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर काटोल उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात पोहचून अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात झालेल्या नुकसानभरपाई करीता पाण्याखाली आलेल्या जमीनी झालेल्या पीकांची हानी चे सर्वेक्षण करण्याचे निर्देश काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे यांनीच राजस्व, ग्राम विकास व कृषी विभागाचे अधिकारी यांना दिले आहेत।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button