गायत्री जगदाळे यांची बदली रद्द करा अन्यथा शाळेला कुलपे ठोकू,पालकांचा इशारा

घाटनांद्रे /जालिंदर शिंदे. :-
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
घाटनांद्रे ( ता.कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका गायत्री अशोक जगदाळे यांची बदली रद्द करावी अशी मागणी इ.चौथीच्या वर्गाच्या पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा नाविलाजास्त्व शाळेला कुलपे ठोकावी लागतील आसा खणखणीत इशारही त्यांनी यावेळी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे एकुण एकशे दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विद्यार्थ्यांना चौथीच्या वर्गांना शिकवणाऱ्या गायत्री अशोक जगदाळे या अगदी उपक्रमशील शिक्षका असुन त्यांचे विद्यार्थींना चांगले मार्गदर्शनही होते.त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ताही कमालीची सुधारली आहे.दैनंदिन अभ्यास,शिष्यवृत्ती,स्पर्धा परीक्षेची तयारीही त्या चांगल्या पद्धतीने घेत होत्या.दरम्यान सदर शिक्षिकेची अतिरिक्त शिक्षिका केवळ या गोंडस नावाखाली त्यांची रायवाडी प्राथमिक शाळेत बदली करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थांचे अतोनात नुकसान होत आहे.जर त्या अतिरिक्तच आसतील तर याच शाळेतील इतर एखाद्या शिक्षिका ची बदली करुन त्यांची ही बदली रद्द करावी अशी मागणीही डोके वर काढत आहे.पण सदर शिक्षिकेचे बदली रद्द व्हावी याबाबत वेळोवेळी मागणी करूनही बदली रद्द करण्यात आलेले नाही किंवा नवीन इतर शिक्षक देण्यात आलेला नाही.याबाबत कवठेमहांकाळ शिक्षण विभाग तर कायमच उदासिन व नाॅटरिचेबल आसतो याबाबत पालकवर्ग आश्चर्य व्यक्त करीत आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.गायत्री जगदाळे यांची बदली रद्द करून त्यांना पूर्वत घाटनांद्रे प्राथमिक शाळेत नेमणूक द्यावी किंवा नवीन शिक्षक तात्काळ देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर सचिन शिंदे,संतोष शिंदे,अजित शिंदे,शंकर शिंदे,भारत शिंदे,विशाल कोळी,रविंद्र मदने,सचिन कोळी,अकबर मुलाणी,प्रविण मलमे,कृष्णा शिंदे,सिध्दनाथ शिंदे,दिलीप शिंदे, प्रविण शिंदेसह पालकांच्या सह्या आहेत.याबाबत विचार न झाल्यास पालकांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
(चौकट ओळी :-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील स्थानिक शाळांमधील शिक्षणाचा सुमार दर्ज्या आहे हे समजून पालक आपल्या मुलांना कवठेमहांकाळ, जरंडी,यमगरवाडी,कुची,डोंगरसोनी सारख्या शाळेत पाठवत आहेत.रोज गाड्या भ-भरुन इतर शाळांत जात आहेत.ही खरीच धोक्याची घंटा आहे.भविष्यात स्थानिक शाळांना पट ठीकवणेही जिकरीचे होणार आहे हे मात्र खरे आहे.)