Uncategorized

जामगढ-जुनापानी भागात वाघाचा हैदोश*
एकाच आठवड्यात दुसर्या गोवंशांवर वाघाचा हल्ला

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क *राजेंद्र खामकर द्वारा
*कोंढाळी वार्ताहार
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील उपवन कोंढाली-अहमदनगर भागात वाघाने हैदोश घातला असून एकाच आठवड्यात दुसर्यांदा तिन वर्षीय गोर्ह्याला ठार केले
मागील आठवड्यात 15जुलै रोजी दुपारी दिड ते दोन चे दरम्यान जुनापानी येथील गोपालक दिलीप सेवकराम पटले यांचे गायीच्या कळपातील एका गायीवर छडप मारून गंभीर घायाळ केले ही माहीती गावकर्यांना मिळाली तेंव्हा गावकर्याच्या ओरडन्याने वाघाने गायीला अर्धवट खल्याअवस्थेत सोडून पळ काढाला
तर (आज )23जुलै चे सकाळी आठ -वाजता चे दरम्यान याच वाघाने जामगढ येथील शेतकरी धम्मपाल वाहने यांचे शेतातील गोठ्यावर बांधलेल्या तिन वर्षीय गोर्ह्याला वर हल्ला चढवून ठार केले एक कडे पाऊस सुरू असल्याने व या प्रसंगी कुत्र्ये भूंकत असल्या कारनाने शेतकरी धम्मपाल वाहने ट्रैक्टर ने शेतावर गेले तेंव्हा गोठ्याचे समोरच रस्त्यावर वाघोबा बसून होता
कोंढाळी वनपरिक्षेत्रालगतच वर्धाजिल्ह्याचे बोर अभयारण्य आहे या अभयारण्यातील वन्यजीव हिंस्त्र पशु , वाघ बोर अभयारण्यालगतच्या गावां लगत फिरत असतात यातच सध्यातरी मनुष्य हानी झाली नसली तरी जनावरांना आपले खाद्य बनवत आहे कोंढाळी वन परिक्षेत्रातील जुनापानी जामगढ, खापरी, अहमदनगर हेटी चिंचोली, धामनगाव, खैरी, चीखली, मासोद, कामठी धोतीवाडा हा या वन्यप्राणि(वाघांचा)भ्रमण मार्ग बनला कैरिडोर बनला आहे। सध्या खरीप पीकांचा हंगाम आहे।शेतातील खरिप पीकांची कोळपनी, डवरणी ,निंदणाचे दिवस आहे मात्र भर दिवसा वाघोबाचे भ्रमणाने व जनावरावरील हल्याने शेतकरी शेतमजूरांत मोठी दहशत पसरली आहे यामुळे मजूर कामावर येणायास धजवत नाही।
जामगढ येथील माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांना देण्यात आली माहीती मिळताच उपवन परिक्षेत्र अधिकारी एफ बी पठाण, वन रक्षक सुरेंद्र पाटील, वाय टी नपते, किशोर कुसळकर व पुंडलिक सरोदे घटनास्थळी पोहचले व गोर्य्ह्याचा पंचनामा केला
वन विभागाकडून वन गस्ती सुरू असून शेतकरी व शेतमजूरांना सावधगीरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आली आहे ।एवढे सर्व असले तरी वन विभाग व राज्य तसेच केंद्र सरकार जंगललगत शेतकर्यांना व त्यांचे जनावरांचे सुरक्षे करीता ठोस पावले उचलन्याची मागणी ग्रामीण व वनालगतचे शेतकरी करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button