अड्याळ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न



पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
“पोलीस की आवाज” न्यूज नेटवर्क :::
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आदर्श गाव अडयाळ येथे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी अंतर्गत अड्याळ कालवा दुतर्फा वृक्ष लागवड ०२ की.मी. सौ. जयश्रीताई कुंभलकर ग्रामपंचायत सरपंच आड्याळ यांचे हस्ते, येथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम माजी.शिक्षण अधिकारी, श्री.बोरकुटे साहेब ठाणेदार आड्याळ तसेच श्री.सा.ए.रिझवी साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी आणि सुजाता कन्या विद्यालय मुख्याध्यापिका सौ.बी. व.गिरिडकर , हरित सेना शिक्षक श्री.ये.डी. सराटे, कू.एल.एम.शेंडे मॅडम, व माजी.शिक्षण अधिकारी श्री. टीचकुले साहेब , श्री.आर.जी.मेश्राम वनपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी यांनी सर्व मान्यवर व हरित सेना विद्यार्थी यांना झाडाविषयी माहिती व झाड कशे लावावेत हे सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना रोपांची माहिती , रोपांच्या प्रजाती , रोपे लागवडीचे प्रात्यक्षिक , जमिनीच्या प्रकारानुसार रोपे लागवडीचे नियोजन,रोपांचे संरक्षण संवर्धन, ,रोपवन यशस्वी झाल्यानंतर वृक्षाच्या रुपाने त्यापासून मिळणारे प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष फायदे.याची सखोल सविस्तर माहिती यांनी विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व पटवून देऊन जल,जंगल, जमीन.याचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान केले. नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे प्रात्यक्षिक धडे घेतले….सर्व सा. व. प. पवनी कर्मचारी तसेच हरित सेना विद्यार्थी व श्री.विनोद ढोणे रोजगार सेवक तीर्री, श्री.रामटेके रोजगार सेवक कलेवाडा तसेच गावातील गणमाननिय नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
