उत्कर्ष मोटेचा मान्यवरांच्या कडून सत्कार

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
घाटनांद्रे/वार्ताहर :- जिल्हा परिषद शाळा रांजणी (ता कवठेमहांकाळ)येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कु उत्कर्ष उतम मोटे हा नवोदयची परिक्षा उत्तीर्ण होऊन,त्याची नवोदय शाळेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.तर शाळेच्या वतीनेही त्याचा सत्कार करण्यात आला.
त्याला याकामी मुख्याध्यापक गुणवंत खोत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र सुतार,वर्ग शिक्षक शशिकांत जाधव,रेखा देवमाने,कुंभार मॅडम,पोतदार मॅडम,गडदे मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले तर पंचायत समितीच्या सभापती निलम पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले यांनी प्रत्यक्ष भेटून उत्कर्षचे कौतुक केले.
(फोटो ओळी :- रांजणी (ता कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी उत्कर्ष मोटे याचा सत्कार करताना सभापती निलम पवार सोबत गुणवंत खोत,रेखा देवमाने व इतर.)
