पवनी तालुक्यात अतिवृष्टी ग्रस्त भागाचे समस्या मार्गी लावण्या साठी पं. स. सभापती डॉ. नूतन कुर्झेकर यांनी दिली भेट
पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::
भंडारा जिल्ह्यातील
पवनी तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाचे तसेच पालोरा – लोनारा येथील जिल्हा परिषद शाळेला, आयुवेदीक दवाखाना, अंगवाडी आणि गावाला पवनी पंचायत समिती सभापती डॉ . नूतन कुर्झेकर यांनी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी पालोरा सरपंच अनिता गिरहेपुंजे तसेच दवाखान्यातल्या कर्मचारी यांनी आपल्या समस्या मांडल्या . दवाखान्याच्या व जिल्हा परिषद शाळेच्या पटांगनात खराब पाणी सीरला आहे पवनी सभापती मॅडम यांनी प्रत्यक्ष पाण्यात जाऊन बघितला. मुलाला कोणत्या पण प्रकार चा आजार होऊ नये म्हणून शाळेच्या शिक्षकाला सूचना दिली की जेव्हा पर्यंत पाण्याचा मार्ग मोकडा होत नाही तोपर्यंत शाळा दुसऱ्या ठिकाणी भरावा असा मंतला त्याना भेट देऊन समस्या मार्गी लाहू असा आस्वासन दिला.आणि जेसीपी बोलावून पाण्याचा मार्ग मोकडा करायला सुरुवात केली .जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. पालोरा येथील पूर्व माध्यमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिकत असून त्यांना लिहिता वाचता येते का? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भेट दिली. वर्गात जाहून मुलांना प्रश्नः विचारले सर्व आश्चर्यचकित झाले गावातील लोकांना प्रतक्ष भेटून सर्वाना समस्या ची विचार पूस केली सर्वांच्या समस्या मार्गी लावीन अस पवनी पंचायत समिती सभापती डॉ .सौ. नूतन कुर्झेकर यांनी सांगितलं.



