भारतातील नंबर वन न्युज *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* ठानेदार मा.दिपक पाटील यांच्या अथक प्रयासामुळे वाहुन गेलेल्या बेपत्ता युवकांचे प्रेत ४८ तासानंतर गोताखोरांना गवसले.प्रकरण कवलेवाडा-चीखला मार्गावरील नाल्यातील पुरात वाहून गेलेल्या बेपत्ता युवकाचा

*राजेश ऊके*,पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क द्वारा
संजीव भांभोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकलसह वाहून गेल्याची घटना तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला मार्गावरील नाल्यावर १४ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यापैकी एक जण बचावला तर दुसरा पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने बेपत्ता होता.
घटनेच्या दिवशी गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बेपत्ता तरुणाचे शोधकार्य सुरु केले त्यानंतर अंधारामुळे १४ जुलै रोजी शोधकार्य थांबविण्यात आले. तर १५ जुलै रोजी परण सकाळी बेपत्ता तरुणाचे येथिल स्थानीक गोताखोराच्या माध्यामातून शोधकार्य हाती घेतले. असता सदर नाल्याच्या पुराच्या पाण्यात हीरो होंडा ग्लँमर कंपनीची क्र एम एच ३६ /३०२० क्रमांकाची मोटारसायकल मिळाली पण पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता
युवकांचा शोध सांयकाळ पर्यंत लागला नव्हता.१५.जुलै ला रात्र होताच शोधकार्य थांबविण्यात आले. त्यांनतर परत १६ जुलै रोजी सकाळी कवलेवाडा -चिखला नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या त्या बेपत्ता तरुणाचे येथिल स्थानीक गोताखोराच्या माध्यामातून शोधकार्य सुरू केले असता अखेर ४८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर येथिल स्थानीक गोताखोरांना १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान
बेपत्ता युवक सारांश मुन्नालाल सुखदेवे(२७) रा खैरलाजी .जि बालाघाट, (मध्यप्रदेश) यांचे प्रेत
कवलेवाडा-चिखला नाल्यातील पुलापासुन ५० ते ६० फुटाच्या अंतरावर पुराच्या पाण्यात झाडे झूडपात मिळाले. सदर युवकांच्या अंगावर पावसाळी कपडे परिधान केले होते. ४८ तासांनंतर शव मिळाले असल्याने शव पुर्णतः फुगलेल्या अवस्थेत असल्याची माहिती गोबरवाही पोलिसांनी दिली.
मृतक सारांश मुन्नालाल सुखदेवे (२७) रा खैरलाजी, जि बालाघाट, असे मृतकाचे नाव आहे तर बचावलेला युवक रवी टेकाम (३१) रा खैरलांजी जि बालाघाट असे बचावलेल्या युवकांचे नाव आहे.
रवीची सासुरवाडी असलेल्या तुमसर तालुक्यातील बाळापूर/ हमेशा येथे आले होते. १४ जुलैच्या रात्री चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते. रात्री ८ वाजता कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही. त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पुराच्या पाण्यात पडले.असता यापैकी रवी टेकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. तर सारांश सुखदेवे हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती सासुरवाडीला दिली. त्यांनी ही माहिती तात्काळ गोबरवाही पोलिसांना दिली.गोबरवाही चे ठानेदार मा.दिपक पाटील व पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या तरूणाचा शोध सुरू केला. मात्र अंधार व नाल्यातील पाण्याचा अंदाज येत असल्याने बेपत्ता तरुणाचा दोन दिवस थांगपत्ता लागला नाही, शेवटी १६ जुलै रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान कवलेवाडा -चिखला नाल्यातील पुराच्या पाण्यात स्थानीक गोताखोरांना शोधमोहीम दरम्यान बेपत्ता तरुण सारांश सुखदेवे याचा मृतदेह मिळाला. गोबरवाही पोलीसानी सदर घटनेचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहीती देण्यात आली. सदर घटनेचा पुढील तपास गोबरवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक पाटील, उपनिरीक्षक विलास करंगामी, बिट अमंलदार चव्हान आदी करीत आहेत.


