Uncategorized

अडयाळ येथे ईद साजरी करून केले वृक्षारोपण

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क :::

पवनी तालुक्यातील अडयाळ येथे जमा मस्जिद अध्यक्ष अशपाक खान,मदिना मस्जिद अध्यक्ष सोहेल खान यांच्या नेतृत्वखाली सुख,शांतीने सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एक दुसऱ्यांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच मदिना मस्जिद अध्यक्ष सोहेल खान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम कब्रस्तान मध्ये वृक्षारोपण पण करण्यात आले.आजच्या काळात पर्यावरण चे रक्षण करणे काळाची गरज आहे म्हणून कब्रस्तान मध्ये पिंपळ,नीम,आंब्याचे झाड तसेच इतर प्रजातीचे झाडे लावण्यात आले.या प्रसंगी अडयाळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे,पोलीस आडे सोरते,बावानकुडे,देवकते,ढोक मॅडम इतर पोलीस कर्मचारी व सैनिक यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन आपले कर्तव्य पूर्ण केले.तर सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button