Uncategorized

माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांचा वाढदिवसाला पत्रकार संघातर्फे सत्कार

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) १० जुलै माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुका व शहर वतीने त्यांचे शुभेच्छाभिनंदन करून शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. 
       निसर्गप्रेमी, वृक्षलागवड छंदाबरोबरच आरोग्य शिबीरात हजारांवर आकडा पार करणारे माजी आमदार डॉ .हेमकृष्ण कापगते यांना वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून शुभेच्छा देऊन शाल ,श्रीफळ देत सत्कार केला. सत्कार कार्यक्रमात संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, साकोली तालुकाध्यक्ष निलय झोडे, शहराध्यक्ष ञ्रृग्वेद येवले, तालुका सचिव प्रा. मनिषा काशिवार, ता. सहसचिव प्रा. चेतक हत्तीमारे, शहर सचिव प्रा. ताराचंद कापगते, सदस्य मनोज गजघाट, रवि भोंगाने व कैमरामैन होमेश गहाणे उपस्थीत होते.  प्रसंगी डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या बद्दल आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य शिबीरे व वृक्षारोपणाबाबद प्रा. मनिषा काशिवार यांनी माहिती पटवून दिली. संचालन आशिष चेडगे तर आभार रूगवेद येवले यांनी मानले. कार्यक्रमात श्याम रूग्णालयातील मोरेश्वर गहाणे, राजू कापगते, भागवत लांजेवार, विवेक कापगते इत्यादी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button