किडेबिसरीचे प्रा निवांत कांबळे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी
भारत का नंबर वन न्युज नेटवर्क
◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क◆
घाटनांद्रे/ वार्ताहर :- किडेबिसरी (ता सांगोला) येथील प्रा निवांत विठ्ठल कांबळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात पीएचडी मिळाली असून त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.
निवांत कांबळे यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन,त्यांचे प्राथमिक शिक्षण हे किडेबिसरी (ता सांगोला) येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात घेतले तर उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे पार पडले.तेथे त्यांनी इंग्रजी साहित्य विषयात एमए केले.२०१३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची कठीण अशी नेटची परीक्षा उतीर्ण होऊन ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA पुणे येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.आता ते मुंबई विद्यापीठ संलग्न ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय कांदिवली मुंबई येथे प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत.
त्यांनी ‘अँनालाझींग ओरल हिस्ट्री ऑज अन एक्सप्रेसिईन ऑफ पोलीफोनी अ क्रिटिकल स्टडी ऑफ स्वेतलाना अलेक्सईविच सिलेकटेड वर्क्स ऑफ नॉन फिकशन’ या विषयावर पुणे विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.त्यास त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळाली. याकामी त्यांना पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ शिल्पागौरी गणपुले,विलिंग्डन महाविद्यालयाचे प्रा. डॉ रत्नदीप जाधव यांचे मार्गदर्शन तर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कोळेकर,आई सिंधूताई कांबळे,पत्नी प्रियांका कांबळे,मुलगा राजरत्न यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
(फोटो :- निवांत विठ्ठल कांबळे.)

