भंडारा बसस्थानकात रांगोळीतुन साकारली विठुरायाची पंढरी
पंकज वानखेडे अड्याळ/पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क :::::
👇 भंडारा जिल्ह्यातील प्रवाशांसह वारकरी घेतात पंढरपूर माऊलीच्या पालखीचे दर्शन
दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी यात्रा भरत असते मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. यंदा १० जुलै रोजी आषाढी एकादशी येत असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून चित्रा आर्ट च्या संचालिका चित्रा वैद्य यांनी
वारकऱ्यांच्या सेवेसाठी बस स्थानकात रांगोळीतुन पंढरपूर वारीच्या दर्शनासाठी सज्ज झाली आहे. पंढरपुर हे भंडारा जिल्ह्यापासून ७५० किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्यात विठ्ठलाचे भक्त कमी नाहीत. कोरोना महामारीपूर्वी दरवर्षी विठ्ठलभक्त पंढरपूर येथे पायी वारी करतात. विठुमाउलीच्या चरणी हजेरी लावून माथा टेकत असतात. विठ्ठलभक्तीचा गजर करतात. आणि जीवन सफल झाल्याचा आनंद उपभोगतात. मात्र काही वारकऱ्यांना जाता आले नाही. याकरिता भंडारा येथील बसस्थानकात भव्य रांगोळीतुन पंढरपूरच्या वारीच्या दर्शनासाठी सज्ज आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांसह वारकरी घेत आहेत.

