महाराष्ट्र शासनाकडून डॉ.सुरेश राठोड यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल विशेष सत्कार
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )-कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर येथील सुरेश किसन राठोड यांच्या पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल कडून जर्नालिझम आणि सोशल सर्विस या विषयातील मानद डॉक्टरेट पदवी शिवाजी युनिव्हर्सिटी इतिहास परिषदेचे सदस्य डॉ.धीरज शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
डॉ.सुरेश राठोड यांनी 2007 पासून गेली पंधरा वर्ष पत्रकारितेमध्ये ग्रामीण पत्रकार ते संपादकीय पदापर्यंत केलेली वाटचाल अतिशय खडतर व समाज हितासाठी होती. त्यांनी आत्तापर्यंत पाक्षिक, साप्ताहिक, न्यूज पोर्टल, तसेच अनेक दैनिकांमध्ये विशेष लेखन केले आहे. पोलीस न्यूज कस्टडी, दक्ष टाइम्स, पुरोगामी न्यूज, आर के न्यूज, सह्याद्री लाईव्ह न्युज, दैनिक जनमत मध्ये कार्य करत त्यांनी आपल्या लेखणीचा वापर समाज हितासाठी केला.
त्याचबरोबर दैनिक लोकमत सखी मंच प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष महिलांचे संघटन, हिंदू रक्षा समिती मध्ये महाराष्ट्र महामंत्री, रेशन कृती समिती ग्रा. जिल्हाअध्यक्ष, राठोड फाउंडेशन जिल्हाध्यक्ष, योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्स जिल्हाधिकारी, सरपंच सेवा संघच्या पुणे विभाग समन्वयक अशा अनेक पदावर सध्या ते कार्यरत आहेत. डॉ.राठोड यांना अनेक, फाउंडेशन व पोलीस डिपार्टमेंट ने आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक, आदर्श समन्वयक, आदर्श संपादक अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ राठोड यांनी मिळवलेल्या मानद डॉक्टरेट पदवी बदल महाराष्ट्र शासन कडून मराठी विश्वकोश चे सदस्य डॉ. कृष्णदेव गिरी यांनी आयोजित कार्यक्रमांमध्ये विशेष सत्कार केला. त्याचबरोबर डी वाय एस पी पुरुषोत्तम पाटील, डॉ. सुमित्रा भोसले पाटील, डॉ. सुशील अग्रवाल, पत्रकार सुरेश माडकर, माजी सभापती अश्विनी धोत्रे, बोंद्रे पतसंस्था चेअरमन पंडितराव बोंद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, पीएसआय दत्तात्रय शिंदे अशा अनेक मान्यवरांनी डॉ. राठोड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

