Uncategorized
आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी मुस्लिम बांधवांतर्फे प्रार्थना
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::
🎤 पंकज वानखेडे :::
भंडारा: भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी आज मुस्लिम बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. हिंदू-मुस्लिम या समाजामध्ये बंधुभाव वाढावा, भंडारा शहराचा रखडलेला विकास नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावा यासाठी बाबा पहेलवानशाह बाबा करिशाह,आणि दवडीपार येथील बाबा गालीबशाह यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात आली.यावेळी आरिफ शेख,टिंकू खान,जुनेद खान,आसिब खान आदी उपस्तिथ होते.


