जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चेक वाटप
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँकेतर्फे शेतकऱ्यांना धनादेश वाटप भंडारा जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक शाखा साकोली तर्फे किनहीं व तुळमापुरी येथील शेतकऱ्यांचे धान्याचे पूजने एक वर्षापूर्वी जळलेले होते त्यांना आर्थिक मधून मदत म्हणून भंडारा जिल्हा सेंटर को-ऑपरेटिव बँक शाखा साकोली तर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आला याप्रसंगी भंडार डिस्ट्रीक्ट सेंटर को-ऑपरेटिव्ह बँकेचे जिल्हा बँक चे अध्यक्ष सुनील फुंडे, सभापती मदन रामटेके,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पालक संचालक होमराज कापगते ,सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे ,प्रदीप मासुरकर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डी जी रंगारी,सुनील जागिया, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित होते 19 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5000 रुपयाचे चेक वाटप करण्यात आले त्यामध्ये विजय प्रल्हाद पटले, प्रदीप मधुकरराव मासुरकर, जाधव हिरामण क्षीरसागर ,मारुती जना नेवारे ,बाबुराव हिरामण शिरसागर, शंकर श्रीराम क्षीरसागर, सुनील रामजी क्षीरसागर, रामजी लिंगा क्षीरसागर, भैय्यालाल रामजी कापगते, तिलकचंद यशवंत कापगते ,भीमराज रामचंद्र कापगते, व्यंकट काशिनाथ कापगते, रमेश चैत्राम पटले, मोतीराम इस्तारी फुलबांधे ,प्रभाकर तुळशीराम फुलबांधे ,रेखा जाधव क्षीरसागर ,एकनाथ सुनील क्षीरसागर ,नंदू मोतीराम फुलबांधे ,अडकन दसाराम पटले, इत्यादी 19 शेतकरी आहेत सेंटर को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या नुकसान ची भरपाई म्हणून आमच्या बँकेतर्फे अल्पशा का असेना आम्ही या शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे आणखी काही मदत जास्त देता येईल का याविषयी सभेत चर्चा करून विचारविनिमय करण्यात येईल असे सुनील मुंडे यांनी भंडारा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह शाखा साकोली च्या सभागृहात आपले मत व्यक्त केले याप्रसंगी पालक संचालक म्हणून होमराज कापगते बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिवलसरे सभापती मदन रामटेके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमा संचालन व आभार प्रदीप मासुरकर यांनी केले तर आभार प्रभाकर सपाटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

