Uncategorized

■■■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■■■ चारगाव परिषरात अज्ञात मुलीचा म्रुतदेह आढळला सदर मुलीचे प्रेत काटोल पोलीस स्टेशन हद्दीत मिळाले


पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क

वार्ताहर-काटोल

काटोल पासून 10 किलोमीटरवर असलेल्या चारगाव जवळील वीटभट्टी च्या मागे अज्ञात मुलीचा मृत्यू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक युवती हि 18 ते 22 वयोगटातील आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी  अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वी. 302, 201 अनव्यये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

चारगाव जवळील सत्यनारायण अग्रवाल यांच्या शेतात असलेल्या वीटभट्टी समोरील रोड लगत बिहाडीचे झाडाखाली एका मुलीचा मृतदेह पालत्या अवस्थेत, डावे कुशीवर पडून दिसले असता फिर्यादी चारगाव चे उपसरपंच संघपाल बागडे यांनी घटनेची माहिती ठाणेदार यांना दिली. त्यावरून पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. 

मृतक मुलगी हि 18 ते 22 वयोगटातील असून तिच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी शर्ट व खाली काळ्या रंगाचा पांढऱ्या लांब रंगाचा पट्टा असलेला प्लाझो घातलेला आहे. महिलेच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्या जवळ कोणत्यातरी टोकदार हत्याराने दोन घाव असून उजवे कानाला लागून दोन घाव तसेच कानामागे जखम आहे. चेहरा हा रक्ताने माखलेला, उजवे हातावर मनगटाजवळ तीन स्टार गोंडलेले आहे. अज्ञात इसमाने कोणत्यातरी टोकदार हत्यार चेहऱ्यावर भोसकून तिला जीवानिशी ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पळून गेला. पोलिसांनी मृत्यूदेह हा नागपूर येथे पोस्टमार्टेम करिता नेला आहे.

सदर मुलीचे प्रेत पो. स्टे. काटोल हद्दीत मिळाले आहे.

वर्णन
वय -अंदाजे 20 ते 22 वर्ष

रंग. – सावला

कपडे. – अंगात पिवळ्या रंगाची टी शर्ट ज्यावर इंग्रजीत Love लिहिलेलं खाली प्लाझो काळ्या रंगाचा ज्यावर पांढऱ्या लाईनिग असलेला

चिन्ह. – उ जव्या हातावर तीन स्टार टॅटू

तसेच पांढऱ्या धातूची अंगठी ज्यावर इंग्रजी मध्ये Love लिहिलेला व दुसरी एक धातूची अंगुठी

नाकात -बेसर घातलेली

डोक्याचे केस लांब अर्धे केस highlight केलेले आहेत.

डाव्या पायाचे पंजावर वरचे बाजूस दोन जुने जखमे चे निशाण दिसत आहे.

कुणीही ओळखत असल्यास कृपया स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथे खालील मोबाईल क्रमांकावर कळविणेस विनंती आहे.

संपर्क क्रमांक

पो. नि ओमप्रकाश कोकाटे स्था. गु. शा. नागपूर ग्रामीण 9923480804

स.पो. नि राजीव करमलवार
9021452760

स.पो. नि. जितेंद्र वैरागडे 9420178674

स.पो. नि. अनिल राऊत 8668385576

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button