■■■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■■■ चिखला गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन केला तिथल्या तलाठ्याच्या विरोधात






★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★:-मिळालेल्या माहितीनुसार चिखला गावातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी चिखला गावाचे तलाठी राजेंद्र कदम यांच्या विरोधात तलाठी कार्यालयासमोर अनसन बेमुदत आंदोलन सुरु केले.
सविस्तर व्रुत्त असे कि जे शेतकरी उन्हाळी धान्याची लागवड करतात त्यामध्ये ज्यांनी उन्हाळी धान्य लावलेच नाही अशा शेतकऱ्यांचा ७/१२ व्यापारी, दलालांना दिला व ज्यांनी धान्य लावले त्यांचे फेडरेशन च्या केन्द्रात काट्यावर मोजनी झाली नाही.व्यापारी/दलालांचे धान्य बरोबर मोजून घेण्यात आले व धान्य लागवड शेतकऱ्यांवर अन्याय होतो असे शेतकऱ्यांचे मत होते आणी नंतर केन्द्र सुध्दा बंद पडला.
तुमसर तहसील चे तहसीलदार मा. बालासाहेब टेळे व थानेदार दिपक पाटील आंदोलन स्थळी आले.
मा. बालासाहेब टेळे तहसीलदार तुमसर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की पंधरा दिवसांत चौकशी करुन दोशीवर योग्य ती कार्यवाही करु. त्यानंतर अनसन आंदोलन मागे घेण्यात आले.