Uncategorized

आष्टी गावात महिला मेळावा संपन्न


■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
उडान या संस्थेच्या वतीने आष्टी गुरुदेव सेवा मंडळाच्या आवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले उडाणच्या संस्थापक सौ कल्याणी ताई भुरे तुमसर यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सौ प्रीती खेमराज सोनवणे माजी सरपंच व फेमिदागवान यांचेकडून करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात विविध गेम शो घेण्यात आले त्यामध्ये पैठणी साडी जिंका एक मिनिटाचे वेळ देऊन परिचय देण्याची स्पर्धा झाली. लकी ड्रॉ याप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महिला सरपंचांचा सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला उपस्थित आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व आजी-माजी महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट व गावातील 500 महिला उपस्थित होत्या. कल्याणी भुरे सारिका कोतपल्लीवार पार्वतीबाई नागपुरे ज्योतीबाई गेडाम यांनी महिलांना मार्गदर्शन केले संचालन सौ प्रीती खेमराज सोनवणे माजी सरपंच यांनी केले प्रास्ताविक फर्मिदा आगवान यांनी केले आभार प्रदर्शन पार्वतीबाई नागपुरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button