भारत देशातील खुप तेजगतीने प्रसारित होणारा न्युज ■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ चुलत भाऊच निघाला अनिकेशचा मारेकरी


पंकज वानखेडे अड्याळ/ पवनी :::
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
■ ‘त्या’ व्यापाऱ्याच्या हत्येचे गुढ उकलले
👇 ‘पोलीसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
👇 अड्याळ पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची यशस्वी कामगिरी
नागपूर येथील अनिकेश अजाबराव क्षिरसागर या पाइप व मोटारपंप डिलर असलेल्या तरुण व्यापाऱ्याचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह नेरला ते पागोरादरम्यान इटगाव जंगलात मुख्य रस्त्यापासून 50 मीटर अंतरावर आल्याची घटना 30 जून रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा वेगाने तपास व पाठपुरावा करीत बारा तासांत शुक्रवारी आरोपीला बेड्या ठोकल्या. संदेश राजेंद्र क्षीरसागर ( 24 ) रा. प्लॉट क्र. 905, साई कृष्ण रेसिडेंन्सी पिपळा हुडकेश्वर, नागपूर असे त्याचे नाव असून तो मृताचा चुलतभाऊ आहे.
30 जून रोजी जंगलात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, एसडीपीओ रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा व अड्याळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिथे मिळालेल्या
पुराव्यावरून हा मृतदेह नागपूर येथील व्यापारी अनिकेश अजाबराव क्षिरसागर याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलिस पथक आरोपीच्या शोधात तपास कार्याला लागले.
अड्याळ येथील गिऱ्हेपुंजे यांच्या दुकानात मृतक व्यापारी अनिकेश व त्याचा चुलतभाऊ नागपूरहून वसुलीसाठी आले. त्यानंतर भंडाराच्या दिशेने नागपूरकरीता निघाल्याचे दिसून आले. त्यामुळे मृतकासोबत आलेल्या चुलतभाऊ संदेश याच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्याने मी एकटाच कलेक्शनकरिता ब्रह्मपुरी येथे गेलो. तर भाऊ
अनिकेश क्षिरसागर हा कार घेवून भंडाराकडे गेल्याचे सांगितले. मात्र त्याची चौकशी करीत असताना दिलेल्या माहितीत विसंगती असल्याने संशय बळावला. संदेशला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीकरिता अड्याळ पोलिस स्टेशनला आणले. सराईत गुन्हेगाराप्रमाणे संदेशने सुरुवातीला पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला. परंतु तांत्रिक पुरावे व त्याच्याकडे मिळालेल्या साहित्यावर रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली.
संदेशने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने चुलतभाऊ अनिकेशची निर्घृण हत्या केली.
आपल्यावर संशय येवू नये म्हणून घटनेला वेगळे वळण व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही केला. संदेशने गाडीतील रोकड, मृताच्या शरीरावरील सोन्याचे आभूषण, शस्त्र, चटई व टिफीन इत्यादी साहित्य आपल्या बॅगमध्ये टाकले व तो ब्रह्मपुरीच्या दिशेने गेला. मगरीचे अश्रू ढाळण्याचे नाटकही केले. मात्र भंडारा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती व एसडीपीओ रिना जनबंधु यांनी प्रत्यक्ष चौकशी केल्याने गुन्हा उघडकीस आणण्यात यश आहे. या तपास कार्यात पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, पो.नि विवेक राऊत, हरी इंगोले, हेमराज सोर्ते, केळकर, हेड काँस्टेबल मोहरकर, मारबते, महाजन, खराबे, मस्के, रहांगडाले, जांभुळकर, पुराम, वैद्य यांनी शोध व तपासकार्यात सहभाग घेतला. पुढील तपास अड्याळ पोलिस करीत आहेत.
