भारत देशात तिव्र गतीने रप्तार पकडणारा ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ★ सभापती सौ. नुतन कुर्झेकर यांनी घेतली आढावा बैठक

सभापती सौ . नूतन कूर्झेकर यांनी घेतली आढावा बैठक
पंकज वानखेडे पवनी ::
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ ::
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुका पंचायत समिती
सभापती सौ . नूतन कूर्झेकर यांनी आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
दि. 1 जुलै 2022 ला कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद भंडारा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जीभकाटे आणि आरोग्य व शिक्षण सभापती रमेशजी पारधी तसेच जिल्हा परिषद अधिकारी वर्ग यांचे समवेत अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शालेय पोषण आहार हे खूप निकृष्ट दर्जाचे असते व त्यांचे नमुने शिक्षण सभापती रमेश जी पारधी यांना दाखविले, तरीही पोषण आहार पुरवठाधारकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि पुरवठाधारक बदलण्यात यावा अशी विनंती केली.
NRHM अंतर्गत सन 2021 22 मध्ये पवनी तालुक्यातील 5 उपकेंद्रांच्या दुरुस्तीचे कामे करण्यात आली ही सर्व कामे खूप निकृष्ट दर्जाचे असून कामे अर्धवट केलेली आहेत आणि कंत्राटदाराने पूर्णतः देयेके उचल केलेली आहेत तरीही संबंधित कंत्राटदारावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी आणि अर्धवट कामे पूर्ण करण्यात यावी असे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
शिक्षण विभाग – सर्वत्र शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शिक्षकांचे रिक्त पद भरती न झाल्यामुळे शाळेमध्ये शिकवायला शिक्षकांची कमतरता आहे ज्या ठिकाणी चार शिक्षकांची आवश्यकता आहे तिथे दोन आणि कुठे तर एकच शिक्षक कार्यरत आहेत करिता जिल्हा परिषद स्तरावर कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेण्यासंबंधाने चर्चा करण्यात आली
याविषयी, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्येच निर्णय घेण्यात येईल असे माननीय शिक्षण सभापती यांनी सांगितले. कोरोनापूर्वकाळात कंत्राटी पद्धतीने कार्य केलेल्या शिक्षकांचे मानधन अजूनही त्यांनी अजूनही प्रलंबित आहेत याविषयी देखील चर्चा करण्यात आली, यासंदर्भात चौकशी करून अहवाल मागविल्या जाईल व निर्णय घेण्यात येईल असे माननीय शिक्षण सभापती यांनी सांगितले.
