Uncategorized

अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीत मेलेल्या स्थितीत युवकाचे प्रेत सापडले

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ईदगाव पुनर्वसन जंगलात आज दिनांक 30 जून 2022 ला दुपारी एक वाजेच्या दरम्यान पवनी ते भंडारा मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर श्रीराम नगर नागपूर व्यक्तीचा मेलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. सदर व्यक्ती चे नाव अनिकेत अजबराव शिरसागर राहणार श्रीराम नगर नागपूर वय अंदाजे 50 असून त्यांच्या मागे पत्नी अर्चना अंदाजे वय 42 वर्षे, मोठी मुलगी अंजली अंदाजे वय 20 वर्षे व लहान मुलगी अंदाजे वय 12 वर्षे असल्याचे लक्षात येते .त्याचप्रमाणे मृतकाची स्वतःची पाईप फॅक्टरी सुद्धा असल्याचे बोलले जाते .त्यांचे ईटगाव पुनर्वसन जंगलात मृतदेह आढळून आले असून त्यांची स्वतःची गाडी क्रमांक एम एच 49A E 2139 ,मोबाईल, त्याचप्रमाणे पाकीट आढळून आले. परंतु पाकीट मध्ये एकही रुपया नसल्याचे लक्षात येते .पुढील तपास अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button