युवा उद्योजक वैभव पाटील यांची अग्रणी फाउंडेशनला सध्दिच्छा भेट व वृक्षारोपण घाटनांद्रे
युवा उद्योजक वैभव पाटील यांची अग्रणी फाउंडेशनला सध्दिच्छा भेट व वृक्षारोपण
घाटनांद्रे/वार्ताहर :- शिरढोण (ता कवठेमहांकाळ) येथील परंतु सध्या पुणे स्थीत असणारे युवा उद्योजक व यशराज बिझनेस ग्रुपचे सर्वोस्वा वैभव अमृत पाटील यांनी अग्रण धुळगांव (ता कवठेमहांकाळ) येथील अग्रणी फाऊंडेशनच्या कार्यालयास सध्दिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली.
यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या माझे एक झाड,एक फौजी एक झाड,स्मृती वन आदी संकल्पनेत सहभागी घेऊन वैभव पाटील यांनीही वृक्षारोपण केले.यामध्ये एक फौजी एक झाड या संकल्पने नुसार त्यांचे मित्र सेवारत सैनिक संतोष कदम यांनी केलेल्या देशसेवेचे प्रतिक म्हणून एका झाडाचे तर माझे झाड संकल्पने नुसार स्वताच्या नावचे तसेच स्मृती वन या संकल्पनेतून आजोबाच्या नावे वृक्षारोपण केले.यावेळी त्यांनी अग्रणी फाऊंडेशनला काही रोपेही भेट दिली.
यावेळी त्यांनी अग्रणी पाणी फाऊंडेशन,सह्याद्री देवराई अग्रणी,अग्रणी शेतकरी गट अदिच्या कामाची पाहणी केली.यामध्ये वृक्ष,पाणी,सेंद्रिय शेती,सेंद्रिय गुळ,ज्वारी प्राॅडक्ट मार्केटिंग,कृषी व्यवसाय याची पहाणी करून चर्चा केली.यावेळी रमेश खंडगळे,सुरेश भोसले,आलेशकुमार खामकर आण्णासाहेब भोसले,हेमंत खंडगळे,प्रशांत देशमुख,आशुतोष कुंभार,शिवदास भोसलेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार शिवदास भोसले यांनी मानले.
(फोटो ओळी :- अग्रण धुळगांव (ता कवठेमहांकाळ) येथे वृक्षारोपण करताना युवा उद्योजक वैभव पाटील सोबत आलेशकुमार खामकर,शिवदास भोसले व इतर.)

