Uncategorized

ग्राम पंचायत अड्याळ येथे कृषी संजीवनी मोहीम/प्रशिक्षण संपन्न.

ग्राम पंचायत अड्याळ येथे कृषी संजीवनी मोहीम/प्रशिक्षण संपन्न.

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्राम पंचायत सभागृहात कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत” महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण,” कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी श्री. आदित्य जी घोगरे साहेब,मंडळ कृषी अधिकारी एल. एम. मेश्राम ,प्रमुख मार्गदर्शक कृषी सहायक श.प्रेम खेकारे,कृषी पर्यवक्षक भुमेश्वरी येरणे, अड्याल चे कृषी सहायक कु.रजनी रागोर्ते,बचत गटाचे तालुका समन्वयक जितेंद्र वंजारी हे होते..तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा शिवशंकर मुंगाटे, पंचायत समिती सदस्य स्मिता प्रशांत गिरी,सरपंच जयश्री महेश कुंभलकर,माजी सरपंच तथा ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष मुनिश्वर मोतीराम बोदलकर , ग्रां. प. सदस्य पंकज गोपाल ढोक हे होते. सदर प्रशिक्षणात शेती विषयक नवीन तंत्रज्ञान,शासनाच्या विविध योजना,पिकाची उत्पादन क्षमता वाढवणे,पिकावरील रोग निवारण, सेंद्रिय खताचा वापर, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. बहुसंख्य महिला तसेच शेतकरी बांधवांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृषी सहायक कु. रजनी राघोर्ते यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button