राष्ट्रपति पदावर आदरणीय द्रोपदी मुर्मू यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यांने महिलांचा स्वाभीमान उंचावला
:- कल्याणी भुरे

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तुमसर यांचे वतीने
दि. 24 जुन रोजी तुमसर येथे एनडीए कडून राष्ट्रपति पदाच्या उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड करण्यात आली…
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या तसेच ओरीसा विधानसभेतील माजी आमदार….
एका महिला आणि त्यातही आदिवासी भागातील महिलेचा विचार करून त्यांना संधी देणे हा महिलांचा सन्मान आहे..
आम्ही महिला मोर्चा देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी महिलांना या माध्यमातुन न्याय दिला आहे…
तसेच श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहे…
भाजपा महिला आघाड़ीने एकतेची साथ घेऊन आनंद साजरा केला…
त्याप्रसंगी
सौ कुंदाताई वैद्य, सौ विद्याताई करवड़े , सौ शिलाताई डोये, सौ उज्जवलाताई मेश्राम, सौ आदिती काळबांधे , सौ प्रितीताई मलेवार ,सौ पल्लवी पाटील आदी महिला उपस्थित होत्या.
