Uncategorized

*पोलीस की आवाज न्युज नेटवर्क *तरुणाई मादक पदार्थांच्या विळख्यात* पोलिसांकडून दुष्परिणामांबाबद जन जागृती

*पोलीस की आवाज नेटवर्क न्युज
*तरुणाई मादक पदार्थांच्या विळख्यात*
पोलिसांकडून दुष्परिणामांबाबद जन जागृती
कोंढाळी-वार्ताहर
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पुर्व संधेला कोंढाळी नगर व कोंढाळी पोलीस स्टेशन च्या हद्दितील अनेक गावांत ठीक ठिकाणी-चौकात तसेच मालवाहतूक करणारे चालक वाहक यांचे वाहतूक केंद्रांवर पोहचून कोंढाळी पोलिसांचे वतीने अमली पदार्थ दुष्परिणांमाबाबद युवक व चालक-वाहकांना एकत्रित करून जनजागृती करण्यात आली.
शहरी भागात तरूण मुले, विद्यार्थ्यी, युवक हे अमली पदार्थांचे व्यसनाचे आहारी जात आहेत असे चित्र निर्माण होत आहे. अमली पदार्थ सेवनामुळे त्यांचे आयुष्य बरबाद(उध्वस्त)होत आहे. तर ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग तसेच महामार्गावरील वाहन चालक -वाहक हे सुद्धा अमली पदार्थ द्रव्य (दारू) मुळे होणार्या अपघातातून वाहन चालक वाहक यांचे होणारे गंभीर अपघात तसेच वाहनांची नासधूस ही होते. या पासुन बचाव करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे माध्यमातून विविध प्रकारे जन जागृती करिता माहीती देण्यात आली. या प्रसंगी एक परका नशा-जीवनभर की सजा,तथा मादक द्रव्याची गोळी- करी जीवनाची होळी असे घोष वाक्य च्या घोषणा देत जनजागृती केली जात आहे.
नागपुर जिल्हातील कोंढाळी पोलिस स्टेशनचे वतीने नागपुर जिल्हा (ग्रा)चे पोलिस अधिक्षक विजय कुमार मगर, अप्पर पोलीस अधिक्षक राहूल माकणिकर, उप विभागीय पोलिस अधिकारी काटोल नागेश जाधव, स पो नि अजित कदम यांचे मार्गदर्शनात कोंढाळी चे उप निरिक्षक राम ढगे , देवेंद्र सोनावले, व पोलिस कर्मचार्यांनी रविवारी दुपारी व सायंकाळी कोंढाळी नगरीचे चौकात , टी पाईंट, वाहन वाहतूक केंद्र, बाजार चौकात , मोहल्यात, तसेच युवक/युवती मंडळांचे सदस्य व सामाजिक , शैक्षणिक, क्रीडा संस्थाचे पदाधिकारी, झोपडपट्टीत जाऊन नागरिकांना सिगरेट ओढणे, दारू पिणे, गांजा ओढणे, खर्रा, तंबाखू,व्हाईटनर ची नशा आदी मुळे दात, घसा,फुफ्फुस, हृदय, मुत्रपिंड पाचनतंत्रा वर गंभीर आराज होऊ शकतात,तसेच कर्क रोगाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे या जनजागृती प्रसंगी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button