Uncategorized
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
*सिल्लोड* ( शेख चांद पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी ) दि.27, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवार ( दि.26 ) रोजी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगराध्यक्षा राजश्री निकम, सोयगावच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, नगरसेवक रउफ बागवान, शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, रतनकुमार डोभाळ, सुनील दुधे, जिल्हा बँकेचे माजी संचालक नाना पा. कळम , संजय मुरकुटे, पप्पू राऊत, विजय खाजेकर, माजी सरपंच इस्माईल कुरेशी , सुनील लांडगे, राजेश्वर आरके,माजी पं. स.सदस्य सय्यद नासेर हुसेन आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

