Uncategorized

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरात धूर फवारणीस सुरुवात

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते मोहिमेचा शुभारंभ संपन्न

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरात धूर फवारणीस सुरुवात

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते मोहिमेचा शुभारंभ संपन्न

     *सिल्लोड* ( प्रतिनिधी ) दि. 22, कोविड 19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने विशेष  निर्जंतुकीकरण मोहीम अंतर्गत शहरात धूर फवारणी करण्यात येत आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सोमवार ( दि.20 ) रोजी धूर फवारणी मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला.

      सिल्लोडमध्ये कोरोना रुग्ण नाही मात्र इतरत्र कोरोनाचे रुग्ण पुन्हा दिसून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेने ही विशेष मोहिम हाती घेतली असून पावसाळ्याचे दिवस पाहता डास निर्मूलनासाठी सदरील मोहीम नियमितपणे सुरू असणार असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले. 

  यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम , शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल,नगर परिषद शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, बबलू पठाण, दत्ता कुडके, मच्छिन्द्र धाडगे, दीपकसेट अग्रवाल, कुणाल सहारे, कैलास इंगे, फहिम पठाण, संदीप पाटील, महेश पाटील, स्वप्नील शेळके, ईश्वर कलभिले, राहुल प्रशाद, सिद्धेश्वर आहेर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button