Uncategorized

अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत तहसिलदार गोरेगांव यांना निवेदन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता
गोरेगांव तालुक्यातील मौजा घोटी अंतर्गत तहसिल कार्यालयासमोर तलाव परिसरात काही लोक बळजबरीने स्वस्वार्थासाठी अवैध मुरुम उपसा करून भरदिवसा त्यांची वाहतूक करून विक्री करीत आहेत अवैध उत्खनन करणाऱ्यां दोषीवर कठोर कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायत घोटीचे उपसरपंच संदीप मेश्राम यांनी तहसिलदार गोरेगांव, जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया, उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोडा, खंडविकास अधिकारी पं. स. गोरेगांव, पोलीस निरिक्षक पो.स्टे. गोरेगांव यांना निवेदन दिले आहे. या परिसरात सर्व शासकीय कार्यालय आहेत, तरीपण कोणतेही शासकीय कर्मचाऱ्यांचा संबंधीत बाबीकडे लक्ष नाही. या संपूर्ण घटनेची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना आणि तलाठी कार्यालयाला दिल्यानंतरही या घटनेकडे त्यांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केला. सदर मुरुम उपसा करण्यासंबंधीची ग्रामपंचायत कार्यालय घोटी तसेच उपसा करुन वाहतुक करण्यासाठी लागणाऱ्या परवाण्याची शासकीय परवानगी न घेता बेधडकपणे वाहतुक करुन विल्यवाट लावली. घोटी ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मौका चौकशी केले असता सदर मौक्याचे ठिकाणी जवळपास २० टॅक्ट्रर आणि २ जेसीबी भर दिवसा मुरुमचा उपसा करत असल्याचे आढळून आले . आता पर्यंत अंदाजे २० लक्ष रुपयाचा मुरुम उपसा करून त्याची विल्यवाट लावण्यात आली . या सर्व घटनेवर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा दुर्लक्ष का आहे असा प्रश्न निर्माण होत आहे . शिवाय या प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी , सदस्य , आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांचा संगणमत असल्याचे दिसून येत आहे . तरी पण संबधीत बाबीची सखोल चौकशी करुन घोटी ग्रामपंचायतीला झालेल्या नुकसान भरपाईची कार्यवाही करुन ती मिळवून देण्यासाठी व तसेच अवैध उत्खनन करणाऱ्यां दोषीवर कठोर कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायत घोटीचे उपसरपंच संदीप मेश्राम यांनी तहसिलदार गोरेगांव, जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया, उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोडा, खंडविकास अधिकारी पं. स. गोरेगांव, पोलीस निरिक्षक पो.स्टे. गोरेगांव यांना निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button