Uncategorized

बोरगाव कासारी य

बोरगाव कासारी येथील पीडित शेतकऱ्याला राज्यमंत्री अब्दुल स


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, बोरगाव कासारी ता. सिल्लोड येथील शेतकरी देविदास मेटे यांच्या जवळपास 12 शेळ्या लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या होत्या. या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने 51 हजार रुपयांची आर्थिक मदत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते देण्यात आली. गुरुवार ( दि. 16 ) रोजी विविध विकास कामांच्या उदघाटन निमित्ताने राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोरगाव येथे आले असता त्यांनी पीडित शेतकऱ्याची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत दिली.

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पीडित शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे खचून न जाता धीर धरावा. मित्र मंडळाच्या वतीने 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली. याव्यतिरिक्त शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देवू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

देविदास मेटे हे अल्पभूधारक असून यात भागत नसल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी 12 शेळ्या विकत घेतल्या होत्या. मुलीचे लग्न असल्यामुळे ते गावात आलेले होते. याच वेळी लांडग्यांनी हल्ला चढवित त्यांच्या संपूर्ण 12 शेळ्या मारल्या. या घटनेमुळे पीडित मेटे दाम्पत्य पुरते हवालदिल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष तथा युवानेते अब्दुल समीर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. समीर यांनी पीडितांना शासकीय मदतीसह राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली होती. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घरी येऊन आर्थिक मदत दिल्याने पीडित कुटुंबाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, नायब तहसीलदार शैलेश पटवारी, गटविकास अधिकारी अशोक दांडगे,  विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप फुलारे यांच्यासह भवन सर्कल प्रमुख हनिफ मुलतानी, विश्वास दाभाडे, युवासेनेचे पदाधिकारी अक्षय मगर, सुखदेव जाधव, रावसाहेब गोराडे यांच्यासह बोरगाव माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव, देविदास मेटे, तुकाराम जाधव, बाबासाहेब जाधव , विठ्ठल जाधव, अनवरबेग मिर्झा , निवृत्ती जाधव, आमीनबेग मिर्झा, शिवाजी शेजुळ, भाऊसाहेब कांबळे, मुमताज पठाण, तुकाराम आहेर व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button