Uncategorized

नेत्यांची पळापळ! ‘दामाजी’ साठी तब्बल ‘इतके’ अर्ज,  छाननीनंतर चित्र स्पष्ट होणार; ‘या’ प्रमुख नेत्यांनी घेतली उडी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आजअखेर ३८९ उमेदवारांनी ४०९ अर्ज दाखल केले आहेत.

काल गुरुवारी अंतिम दिवशी सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांची पळापळ झाली. त्यामुळे प्रांत कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.

विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा ऊस उत्पादक गटातून अर्ज दाखल केला असून त्यांना आव्हान देण्यासाठी बबनराव आवताडे, राहुल शहा, चंद्रशेखर कौडूभैरी, भारत नागणे, तानाजी खरात, सोमनाथ बुरजे, अजित जगताप हे प्रमुख प्रतिस्पर्धीचे अर्ज दाखल झाले आहेत.

छाणणीनंतर भूमिका स्पष्ट होणार

कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशांत परिचारक गट छाणणीनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने तूर्त समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे

शिवानंद पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव जानकर, विष्णू मासाळ, रेवणसिद्ध लिगाडे, सुरेखा ताटे, कांतीताल ताटे या प्रमुख समर्थकांनी अर्ज दाखल केले.

भालके समर्थकात तानाजी काकडे, गुलाब थोरबोले, दौलत माने हे प्रमुख अर्ज दाखल झाले तर राष्ट्रवादीच्या नाराज गटातील अजित जगताप, भारत बेदरे, सुनिल डोके, पांडुरंग चौगुले हे प्रमुख अर्ज दाखल झाले.

याशिवाय संस्था मतदारसंघात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, किशोर दत्तू, मनोज चव्हाण हे अर्ज दाखल झाले.

ब्रह्मपुरी गटात दयानंद सोनगे , संजय पाटील , राजेंद्र पाटील , नितीन नकाते , रमेश भांजे , मरवडे गट अँड नंदकुमार पवार , दौलत माने , सुरेश कोळेकर , अर्जुन खांडेकर , पांडुरंग चौगुले , शशिकांत बुगडे , दामोदर देशमुख , श्रीमंत केदार ,

भोसे  गट विष्णू मासाळ , गुलाब थोरबोले , रामचंद्र जाधव , तानाजी काकडे , आंधळगाव गट संजय पवार , शहाजी उन्हाळे धनजंय लेंडवे,

इतर मागास वर्गीय नितीन पाटील, सचिन आकडे भटक्या विमुक्त जमाती तानाजी खरात , विजय माने , पांडुरंग चौगुले , नामदेव जानकर , मागासवर्गीय मतदारसंघ जयंत साळे , बापू अवघडे , कविता खडतरे , दत्तात्रय खडतरे , महिला राखीव रोहिणी पवार , विजया चौगुले , सुरेखा ताटे , सुमन सावंजी अर्ज भरले आहेत.

गुरुवारचे गटनिहाय अर्ज

मंगळवेढा २३, ब्रह्मपुरी ३१, मरवडे २७, भोसे १९, आंधळगाव १२, महिला राखीव २७, संस्था ५, भटक्या विमुक्त जाती ९, मागासवर्गीय ९, इतर मागासवर्गीय २७.

पोलिस कि आवाज
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी
सचिन सावंत

●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क●च्या बातम्या पाहण्यासाठी ग्रुपला जुडा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button