बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा उपलब्ध करून द्यावी— संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* भंडारा वार्ता येथून जवळच असलेल्या पहेला येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नव्याने रुजू झालेले बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर स्वप्निल करवाडे त्याचप्रमाणे कॅशियर रामप्रसाद काटगाये यांचा आज दिनांक ८ जून २०२२ ला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी प्रामुख्याने यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना संजीव भांबोरे म्हणाले की ,नव्याने रुजू झालेले कर्मचारी पहेला परिसरातील ग्राहकांना योग्य सेवा देतील व कोणत्याही प्रकारची ग्राहकांकडून तक्रार येणार नाही अशा पद्धतीचे सलोख्याचे संबंध ग्राहकांची निर्माण करावे व ग्राहकांना योग्य ती सेवा उपलब्ध करून द्यावी असे त्यांच्या नव्याने रुजू झालेल्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले .त्याचप्रमाणे वाकेश्वर येथील बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बारई यांनीसुद्धा ग्राहकांना आपले समजून त्यांच्याशी आपले संबंध प्रस्थापित करावे व योग्य सेवा द्यावी असे यावेळी नव्याने रुजू कर्मचारी सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले .यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे ,जीवन आधार फाउंडेशन चे भंडारा जिल्हा अध्यक्ष कुलदीप गंधे, राजू मेश्राम ,मंगेश जनबंधू, संजय तिरपुडे ,भगवान दहिवले दिनेश आजबले ,अविराज दहिवले , मेहमूद पठाण ,आदित्य तिरपुडे
त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग, ग्राहक वर्ग व बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विलास बांडेबुचे यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी मानले.

