बनावटी नंबर प्लेट लावलेल्या तिन टीप्पर वर पोलीसांची कार्यवाही…

करडी वार्ता:-
भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार नागलोत तिरोडा ते तुमसर रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना देव्हाळा खुर्द शिवारातील नायरा पेट्रोल पंप जवळ बनवटी नंबर प्लेट लाऊन तिन टीप्पर मध्ये अवैध रीतीने रेती भरुन आढळून आल्याने वाहनातील चालकाकडे जाऊन कागदपत्राची विचारपुस केली असता त्यांनी परवाना असल्याबाबत सांगितले परंतु टीप्पर मध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती दिसून आल्याने तिन्ही टीप्पर पोलीस स्टेशनला जमा करून मुळ कागदपत्रे सादर करण्याची लेखी सूचना देण्यात आली.
यावर वाहणाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रावर चेचेस नंबर व नंबर प्लेट वेगळा व वाहणाची बॉडी वर चेचेस नंबर व नंबर प्लेट वेगवेगळा दिसून आले, त्यानंतर टीपी मध्ये ही वैद्य असल्याचे दिसून आले.
रेती भरलेले तिन्ही टीप्पर ज्याची किंमत 1 करोड 35 लाख व त्या तिन्ही टीप्पर भरलेल्या रेती ची किंमत 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
पोलीस स्टेशन करडी चे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत
व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.



