Uncategorized

*विरोध मोदींना नव्हे तर ईव्हीएम ला हवा!*

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता :-
संपूर्ण देशभर एक अस्वस्थतेचे, भयाचे वातावरण आहे. सामान्य माणूस सुखी नाही, शेतकरी कंगाल झाला आहे, व्यापारी घाईला आला आहे, उद्योजक अतिशय अडचणीत आले आहेत आणि कांही मुठभर उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन पलायन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था दोन तीन उद्योगपतींची बटिक झाली आहे!
देश अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी स्वस्थ आहेत हे चित्र देशातील जनता पहिल्यांदा अनुभवत आहे. हे विदारक चित्र कशामुळे झाले आहे?याचे स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर आहे ईव्हीएम!जनता कितीही बोंबलली तरीही आमची सत्ता कुणीही हटवू शकत नाही याची पक्की खात्री भाजपच्या नेत्यांना आहे. म्हणून ते सामाजिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत आहेत. जात आणि धर्माच्या नावाने देश दुभंगतो आहे की काय?अशीच भिती निर्माण झाली आहे.
एका दलित मुलीला उन्नावमध्ये जीवंत जाळले जाते तेही पोलीसांच्या कडून तिथे सर्व आमदार भाजपाचे कसे निवडून येतात?ज्या हाथरसमध्ये शेतकरी आंदोलन झाले, शेतकर्यांवर मंत्र्यांच्या मुलाने वाहन चालवले आणि शेतकऱ्यांना चिरडले त्या हाथरसमध्ये सर्व आमदार भाजपचे कसे निवडून येतात?निवडणूक झाल्यानंतर माध्यमांमधून जे अंदाज येतात ते बरोबर कसे येतात?निवडणूकीबद्दल शंकाच येऊ नये म्हणून विरोधी पक्षातील कांही नेत्यांच्या मतदानात बदल न करता शंकेला वाव ठेवला जात नाही की काय?अशीच शंका येते!
मला वाटते की मतदान झाल्यानंतर आपल्याला हवे तसे निष्कर्ष माध्यमांमधून काढायला लावायचे आणि आमचेच अंदाज कसे बरोबर आहेत हे बिंबवायचे, असा हा उद्योग असावा, असे म्हणायला खूप वाव आहे!
मित्रांनो, ईव्हीएम आणण्याचे पाप काँग्रेस पक्षाचे आहे परंतु तो एक आधुनिक लोकशाहीमधील प्रयोग होता, हेही मान्य करायला हवे. ईव्हीएम हे मानवनिर्मित आहे आणि त्यामध्ये चुका करता येतात, त्या होत आहेत असे वाटते.
जगाने ईव्हीएम स्विकारले होते आणि ते चुकीचे आहे म्हणून ते नाकारुन परत मतपत्रिका वापरायला सुरुवात केली!मग आपल्या देशात ही चुक का सुधारली जात नाही?हा एक गहन प्रश्न आहे!
लोकांनी ईव्हीएम बद्दल बोलूच नये म्हणजे आमचे जिव्हाळ्याचे जात आणि धर्म, मंदिर मशीदभोंगा हे विषय समोर आणले जातात आणि आपण आपल्यात भांडत रहातो!कोरोनासारखी महामारी देव रोखू शकला नाही तर विज्ञानाने संपला हे समजून घ्यायला हवं. आज देशापुढे बेरोजगारी, शिक्षण, भुक, पाणी, उद्योग हे प्रश्न आ वासून उभे आहेत, त्या प्रश्नावर भाजपचे नेते ब्र शब्द काढायला तयार नाहीत!आपण मात्र विभागलो जात आहोत!
आज देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, आपण देशाच्या मालकीच्या सरकारी संस्था विकत आहोत आणि आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पहात आहोत. जगातील एकही देशात धर्मसत्ता यशस्वी झाली नाही, उलट त्या देशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!आपणही त्याच वाटेवर आहोत. आपली स्पर्धा विकसित देशाबरोबर असायला हवी परंतु आपणच आपली तुलना श्रीलंका, पाकिस्तान बरोबर करून घेत आहोत!
जनतेने कितीही बोंब मारली तरी आम्ही सत्तेतच राहू अशी भाषा केवळ ईव्हीएम मुळे येत आहे. तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?अशी उर्मट विचारणा भाजपचे नेते करतात त्यांना सांगायला हवे की निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले खासदार पंतप्रधान निवडत असतात!ही व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये केली आहे. तुम्ही त्या पवित्र संविधानाचा अपमान करत आहात!
आज देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालू आहे. आज संविधान गुंडाळून ठेवले जात आहे.२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश करताना संसदेच्या पहिल्या पायरीवर माथा टेकवला होता,२०१९ साली संसदेच्या सेंट्रल हाँलमध्ये संविधानासमोर माथा टेकवला होता?पहिल्या त्यांच्या पाच वर्षात संसदेचे महत्त्व संपवले आणि या पाच वर्षात संविधान बदलतात की काय?अशी शंका येते!या देशापुढे भुक, बेरोजगारी, शेती, उद्योग, शिक्षण हे प्रश्न जसे उभे आहेत तसेच संविधान टिकवून ठेवण्याचे सुध्दा मोठे आव्हान असणार आहे!त्यासाठी देशातील सर्व लोकशाही प्रेमी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे!अन्यथा लोक लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरतील, तेव्हा कुणालाही आवरणार नाहीत हे लक्षात ठेवायला हवे!
महादेव माळी, हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button