पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यावर पोलीसांची मोठी कार्यवाही…

भंडारा:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई करत एकूण ₹78,165 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी केली.—

🔹 जुगार अड्ड्यांवर धाड – रोख रक्कम आणि सट्टा साहित्य जप्तभंडारा, तुमसर आणि पवनी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सट्टा आणि जुगार अड्ड्यांवर धाड घालण्यात आली.भंडारा पोलीस ठाणे: आरोपी अक्षय अजय इलमकर (वय 30, रा. कस्तुरबा गांधी वार्ड) याच्याकडून सट्टा पट्टी, निळ्या शाईचा पेन व ₹855 रोख मिळून एकूण ₹855 चा मुद्देमाल जप्त.तुमसर पोलीस ठाणे: आरोपी संतोष तुकडू देशमुख (वय 45, रा. तुडका) याच्याकडून सट्टा पट्टी व ₹470 रोख मिळून एकूण ₹470 चा मुद्देमाल.पवनी पोलीस ठाणे: तीन आरोपींकडून ₹6,260 किंमतीचे जुगार साहित्य, ताशपत्ते आणि रोख रक्कम मिळून एकूण ₹7,585 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. —
🔹 दारू अड्ड्यांवर धाड – मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्तदारू विक्रीच्या अवैध ठिकाणांवरही पोलिसांनी कारवाई करत ₹70,580 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.कारधा पोलीस ठाणे: आरोपी विजय रतिराम सांगोळे (वय 63) याच्याकडून 20 बाटल्या संत्री देशी दारू, किंमत ₹800.तुमसर पोलीस ठाणे: आरोपी संदीपसिंग करणसिंग गौतम (वय 32) याच्याकडून 112 लिटर मोहफुलाची दारू, किंमत ₹11,200.गोबरवाही पोलीस ठाणे: आरोपी सौ. सकुंतला राजू कठौते (वय 65) हिच्याकडून 4 लिटर मोहफुलाची दारू, किंमत ₹400.लाखांदूर पोलीस ठाणे: आरोपी श्रीमती रामकौर जोतीसिंग जुनी (वय 54) हिच्याकडून 72 देशी संत्री दारूच्या बाटल्या, किंमत ₹2,880. —

🔹 एकूण जप्त मुद्देमाल ₹78,165जुगार व दारू अड्ड्यांवर धाड घालून विविध ठिकाणांहून मिळालेला एकूण जप्त मुद्देमाल ₹78,165 इतका असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या ठाणेदार आणि अंमलदारांच्या उपस्थितीत करण्यात आली.—जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे — जुगार, दारू विक्री व सट्टा व्यवहार — समुळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. अशा धाडसत्रामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.—



