अवैध डिझेल वाहतूक करतांना पोलीसांच्या ताब्यात…
9 लाख 42 हजार 300 रुपयांचा माल जप्त…
गोबरवाही वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क गोबरवाही पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा देवणारा ते आसलपाणी रस्त्यावर अनाधिकृत रीतीने वाहतूक करतांना गाळी मिळुन आल्याने त्यामध्ये ज्वलंतशिल द्रव्य डीझेल बाबत विचारले असता डिझेल चे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितल्याने आरोपी चालक मालक प्रभुदास अवथरे रा. हेटी गोरेघाट मध्यप्रदेश यांच्या ताब्यातील चारचाकी ब्लोरो गाडीत बेकायदेशीर डिझेल वाहतूक करतांना त्यामध्ये 470 लिटर डिझेल आणि ब्लोरो गाडी अशी एकूण किंमत 9 लाख 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपी विरुद्ध कलम 3,7 सहकलम 4 , 23 पेट्रोलियम ॲक्ट 132 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले.

पुढील तपास तपास शरद शेवाळे पोलीस निरीक्षक गोबरवाही यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते, पोलीस कर्मचारी मंगेश पेंडाम, नेपाल गभने हे करीत आहेत.



