क्राइम
अवैध हातभट्टी दारु वर धाड…
1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
जवाहरनगर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा नांदोरा शेत शिवारात सुर नदीच्या जवळ मिळालेल्या गुप्त माहिती नुसार हातभट्टी दारु वर धाड मारुन आरोपी मानसिंग सोनवाने रा. शहापूर याच्याकडून 1,04000 रु. अवैध मुद्देमाल मिळुन आल्याने कलम 65)(फ) म.दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, जवाहरनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा दोनोडे, सफो. खैरे पोलीस स्टेशन जवाहरनगर चे पोलीस अधिकारी करीत आहेत.



