दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही…
दोन आरोपींना अटक
पवनी वार्ता:- पोलीस स्टेशन पवनी परीसरात फिर्यादी च्या गुप्त माहिती नुसार दहशतवाद विरोधी शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश बैरागी व पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहिती नुसार व्यंकटेश लॉज & हॉटेल मध्ये अवैध पणे व्यशा व्यवसाय चालत आहे यांनी अशा माहिती वरुन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांना नियुक्त केले आणि घटनेच्या ठिकाणी बोगस ग्राहक तयार करुन व्यंकटेश लॉज मध्ये रेड केली असता आरोपी अजय नागेश्वर (रा.बेलाटी), मालक वेंकटेश बागळे ((रा.साकोली) हे आर्थिक फायद्यासाठी व्यशा व्यवसाय चालवताना मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम 3,4,5 अनैतिन व्यापार प्रतिबंधक अधि. 1956 नुसार नमुद कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पवनी चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हने यांच्या मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखा भंडारा सपोनि गणेश बैरागी, गभने, जांभुळकर, यांनी केली.



