घरफोडी करणारा चोर पोलीसांच्या ताब्यात…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे फिर्यादी राजकुमार पंचभाई यांच्या घरी अज्ञात अज्ञात चोरांनी घरातील समोरच्या दाराची कडी उघडून आत प्रवेश करुन बेडरूम च्या आरमारी चे लॉकर अंदाजे 80,000/- रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोराने चोरी झाल्याची तक्रार केली.अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 305 , 331(3) भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात तपास पथक तयार करण्यात आले आणि आंधळगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अनील गेडाम पोहवा, गणेश मते पोशि. , जितेंद्र वैद्य पोशि. गिरधारी बोकडे यांच्या पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे आरोपी संदिप भोयर राह. खरबी ता. तुमसर याला ताब्यात घेऊन अटक करून चोरी केलेला संपूर्ण माल आरोपी कडून ताब्यात घेतला.



