क्राइम
भंडारा जिल्हात 137 धारा लागु…
कायद्याचा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हात 11 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2025 च्या रात्री 12 वाजेपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) लागु करण्यात आले आहेत.
15 ऑगस्ट स्वातंत्र दिन , गोकुळ अष्टमी गोपाल काला 16ऑगष्ट यासह 22ऑगष्ट रोजी बैल पोळा, 23 ऑगस्ट रोजी मारबत व तान्हा पोळा हा उत्सव जिल्हात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे नियम लागू करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, मिरवणूका, रैली, नारेबाजी यावर बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश काढण्यात आला असून उल्लघंन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कठोर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहे.



