धारदार शस्त्राच्या हल्यात दोन युवक ठार…
भंडारा शहरातील घटना…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते मि स्टिंग ट्यांक गार्डन रोड परिसरात दोन युवकावर धारदार चाकूने हल्ला केला यात मृतक शंशात गजभिए(23) व वसीम टींकु खान(38) यांचा मृत्यू झाला.


माहिती नुसार हा हल्ला जुन्या वादावरुन घटल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर अवघ्या काही तासात भंडारा पोलीसांनी फरार आरोपी ला ताब्यात घेतले.

आरोपी 1) फैजान शेख रा. बाबा मस्तान शाह वार्ड वैरागी वाडा भंडारा 2) साहील शेख (“), 3) प्रितम मेश्राम रा. नांदोरा भंडारा 4) आयुष दहिवले रा. पेट्रोल पंप जवाहरनगर ह्या चारही आरोपींना ताब्यात घेतले. भंडारा शहरातील दुहेरी हत्याकांडामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उल्लास भुसारी व त्यांची टीम करीत आहे.



