क्राइम
अवैध जुगार अड्यावर पोलीसांची धाड…
तुमसर पोलीसांची जबरदस्त कामगिरी…
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मिटेवानी येथील जि. प. शाळा येथे पटागंनावर सार्वजनिक ठिकाणी तासपत्ती पैशाची बाजी लावून जुगार खेळतांनी आरोपी वर तुमसर पोलीसांनी धाड मारली ज्यामध्ये आरोपी जितेंद्र पटले, संजय बोपचे, राजेश कटरे, सतीश रहांगडाले सर्व रा. मिटेवानी

यांच्या ताब्यातून 2670 रु. नगदी, एक होंडा मोटर सायकल, TVS प्लाटीनम मोटर सायकल, रेडमी कंपनी चा मोबाईल, रियलमी कंपनी चे 2 मोबाईल, असे एकूण सर्व सामानाची अंदाजे किंमत 1 लाख 17 हजार 670 रुपये चा मुद्दे माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आले.

सदर ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , पोलीस निरीक्षक संजय गायकवाड
यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुनम साठे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन तुमसर चे अधिकारी करीत आहेत.



