शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरलेला ट्रॅक पोलीसांच्या…

दहशतवादी पथक व जवाहरनगर पोलीस स्टेशन ची संयुक्त कार्यवाही…
जवाहरनगर वार्ता:-प्राप्त माहितीनुसार जवाहरनगर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक गणेश बैरागी व दहशतवाद विरोधी पथक जवाहरनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना संशयपत परिस्थिती मध्ये साईबाबा राईस मिल खरबी च्या गोडाऊन समोर उभा असलेला ट्रक दिसले. ट्रॅक चालक अनिल रणदिवे रा. मुंढरी सडक अर्जुनी, अमित वाघ रा. विनोबा नगर नागपूर यांना ट्रॅक मध्ये असलेल्या तांदळाबाबत विचारपुस करून कागदपत्रे मागितल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर पथकाने बारकाईने ट्रॅक चालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की सदर तांदूळ शालेय पोषण आहाराचे आहे अशी खात्री झाल्याने सदर ठिकाणी रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी( प्राथमिक) जि. प. भंडारा तसेच त्यांचे सहकारी शिल्पा निखारे विस्तार अधिकारी प. स. भंडारा यांना बोलवून ट्रॅक मधील तांदळाची तपासणी करून तांदूळ पोषण आहाराचे असल्याची खात्री पटली त्यानंतर पंचासमक्ष पंचनामा करून ट्रॅक मधिल 210 पोते तांदूळ एकुण कि. 4,83000/- रुपये आणि आयसर ट्रॅक 10,00000/-रु. असा एकुण 14,83000/- रु.मुद्देमाल जप्त केले.
सदर गुन्हा साईबाबा राईस मिल चे मालक सुनील गिरेपुंजे खरबी व ट्रॅक चालक अनिल रणदिवे व अमित वाघ यांच्या विरोधात पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे
यांच्या मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक नितिनकुमार चिंचोलकर (स्था.गु.शा.) , जवाहरनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील,
सपोनि गणेश बैरागी, सपोनि राजकिरण मडावी, संजय कुंजरेकर, रवीन्द्र गभने आणि पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या कार्यवाही केली.



