पोलिसांकडून एन डी पी एस अधिनियम अंतर्गत कार्यवाही…
आरोपींवर गुन्हा नोंद…
भंडारा जिल्हा वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
ला मिळालेल्या माहितीनुसार दिघोरी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा साखरा येथे थ्री स्टार धाब्यासमोर आरोपी प्रितम मेश्राम रा. नंदोरा शहापुर सिगारेट मध्ये अंमली पदार्थ गांजा भरून सेवन करतांना मिळुन आल्याने एन डी पी एस कायद्यातील तरतुदीनुसार काटेकोरपणे पालन करुन आरोपी ला विचारले असता सदर माल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
तसेच आरोपी चे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी यांच्या कडून रक्त व युरीन तपासले व नमुना घेऊन सिलबंद करण्यात आले. आरोपी विरुद्ध कलम २७ एन डी पी एस अक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सपोनि शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि बुराडे, पोहवा मडावी, पोहवा कोसरे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन दिघोरी चे अधिकारी करीत आहेत.



