क्राइम
चोरांचा आतंक वाढला….
राजेश ऊके व डॉ. सुखदेव काटकर द्वारे
देव्हाळी व तुमसर येथे पुन्हा दुकान फोडी
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देव्हाळी येथे 26 जुन च्या रात्री सिताराम कृषी केन्द्र, फर्निचर ची दुकान आणि चार पाणटपरी फोडल्याची धक्कादायक घटना घडली तसेच तुमसर शहराची सुध्दा पाणटपरी फोडली असे एकूण सात दुकाने फोडण्याची घटना घडली.

चार ते पाच दिवसापूर्वी तुमसर येथे सहा किराणा दुकान फोडण्याची घटना घडली होती त्याचे आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत.
ह्या सर्व चोरीच्या घटनेने तुमसर परिसरातील जनतेमध्ये भिती चे वातावरण पसरले ले आहेत. नागरिकांमध्ये पोलिसाविरुद्ध नाराजी पसरत आहेत.
तुमसर पोलीसांच्या पुढे चोरांना पकडने हे मोठे आव्हान ठरले आहे.



